पुणे हादरले : पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या करीत सहाय्यक पोलीस आयुक्तांची आत्महत्या


Pune shook : Assistant Commissioner of Police committed suicide by shooting his wife and nephew पुणे : पत्नीसह पुतण्याची आधी गोळी झाडून हत्या केल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त असलेल्या अधिकार्‍याने आत्महत्या केली. पुणे शहरातील बालेवाडी परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
भारत शेखा गायकवाड असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकार्‍याचे नाव असून या घटनेत पत्नी मोनी गायकवाड आणि पुतण्या दीपक गायकवाड यांचा मृत्यू ओढवला आहे.

हत्येचे कारण अस्पष्ट
भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलातील राजपेठ विभागात सहाय्यक आयुक्त होते मात्र त्यांचे कुटुंब पुण्यातील बालेवाडी परीसरात राहत होते. गायकवाड शनिवारी सुट्टीवर पुण्यात आल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी गोळ्या झाडून पत्नी आणि पुतण्याची हत्या केली. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेत आयुष्य संपवले. परवाना असलेल्या त्यांच्या खाजगी पिस्तुलातून त्यांनी गोळ्या झाडल्या. दरम्यान भारत गायकवाड यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पुणे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहे..






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !