बेताल वक्तव्य करणार्या संभाजी भिडेंचा वरणगावात निषेध
वरणगावला अ.भा.म.फुले समता परीषदेचे निवेदन : अटकेची मागणी
Protest against Sambhaji Bhide who made baseless statements in Varangaon वरणगाव : थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल मनोहर भिडे यांनी बेताल वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्याचा निषेध करून अ.भा.महात्मा फुले समता परीषदेसह माळी समाजातर्फे मनोहर भिडेंवर गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या मागणीचे निवेदन सोमवारी वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार आडसुळ यांना देण्यात आले.
बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या
निवेदनाचा आशय असा की, थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा फुले, स्त्री शिक्षणाच्या प्रणेते सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मनोहर भिडे यांनी अमरावती, वाशिम जिल्ह्यात आपल्या भाषणातून अतिशय वादग्रस्त वक्तव्य करून समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. तसेच देशातील थोर महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू याबद्दलही वादग्रस्त विधान केले. मनोहर भिडे यांच्याकडून वारंवार वक्तव्य करण्यात येते. त्यांचे वय झाल्याने त्यांना पुण्याच्या रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करावे तसेच शासनाने देखील या व्यक्तीवर गुन्हा दाखल अटक करावी.

निवेदन देताना यांची उपस्थिती
निवेदन देतेवेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष माळी, माळी समाज अध्यक्ष संजय माळी, पंच गणेश माळी, जे.बी. माळी, नाना माळी, बबलू माळी, प्रल्हाद माळी, भगवान माळी, निलेश माळी, नाना माळी, बापू माळी, योगेश थोरात, किरण माळी, विशाल माळी, गोविंदा माळी, धनराज माळी, रोशन माळी, अर्जुन माळी, रीतेश माळी, जितु माळी, अमरनाथ सुरवाडे अविनाश माळी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय आशिषकुमार अडसुळ यांना निवेदन देण्यात आले.
भिडेविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी
वरणगाव बसस्थानक चौकात महात्मा फुले समता परीषद आणि माळी समाज यांच्यावतीने ‘भिडे गुरुजी मुर्दाबाद’, या ’भिडेचे गुरुजीचे करायचं काय, खाली डोके वरती पाय’, म्हातार्याला अटक झालीच पाहिजे, भिडेचा निषेध असो ‘ज्योती जय क्रांती’ अशा विविध घोषणांनी बसस्थानक परीसर दणाणला.
