आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ भुसावळातील मुन्ना तेली परीवाराने केले वृक्षारोपण


A tree was planted by the Munna Teli family of Bhusawal in memory of their mother भुसावळ : आपल्या आईच्या स्मृती कायम लक्षात राहण्यासाठी शहराचे माजी उपनगराध्यक्ष मुन्ना तेली व त्यांच्या परीवारातील सदस्यांनी वृक्ष लावून ते जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प केला. यावेळी हिंदू-मुस्लिम एकता मंचचे अध्यक्ष साबीर मेंबर, हरीत शहर-स्वच्छ शहर भुसावळ शहर तथा नगरपरीषद भुसावळचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर नाना पाटील यांनी तेली परीवाराने रावबलेल्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच या उपक्रमाचे अनुकरण समाजातील प्रत्येक घटक करतील, अशी आशा व्यक्त केली. मुन्ना तेली यांनीदेखील कोणत्याही प्रसंगी वृक्ष लावून ते संवर्धन करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला तर भुसावळ निश्चितच हरीत शहर बनल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी. टिटू सेट, तानाजी पाटील, अनिल महाजन, पप्पू सेठ, जमील भाई, रफासेट खंडवा, ईकबाल बागवान, हिंदू-मुस्लिम एकता मंचचे अध्यक्ष साबीर मेंबर, शिरसाट, पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !