Nashik Tehsildar in ACB’s net 15 लाखांची लाच भोवली : नाशिक तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात


12 lakh bribe : Nashik Tehsildar in ACB’s net नाशिक : गौण खनिजाबाबत सुमारे एक कोटी 25 लाखांचा दंड झाल्यानंतर त्याबाबत अपिल प्रकरण प्रांताधिकार्‍यांकडून तहसीलदारांकडे चौकशीसाठी आल्यानंतर 15 लाखांची लाच मागून ती निवासस्थानी स्वीकारताना नाशिक तहसीलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम (44, फ्लॅट नंबर 604, बी विंग, मेरीडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक) यांना नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

असे आहे लाच प्रकरण
52 वर्षीय तक्रारदार यांच्या राजुर बहुला, जिल्हा नाशिक येथील जमिन मालकाच्या जमिनीमध्ये मुरुम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम एक कोटी 25 लाख सहा हजार 220 रुपये दंड आकारण्यात आली होती व तहसीलदारांच्या कार्यालयात त्याबाबत आदेश आले. त्या आदेशाविरुद्ध जमीन मालक यांनी उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले. त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नाशिक तहसीलदार नरेशकुमार बहिरम, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवले. मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर वापर झाल्याचे जमिनीच्या मालक यांनी त्यांचे कथनात नमूद केले. त्याबाबत पडताळणी करण्याकामी तहसीलदारांनी जमीन मालकास त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला, ता.जि.नाशिक येथे स्थळ निरीक्षणावेळी बोलावले होते परंतु जमिनीच्या मालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिल्याचे दिल्याने ते तहसीलदारांना स्थळ निरीक्षणावेळी भेटले असता तडजोडीअंती 15 लाखांची लाच मागण्यात आली व तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी होवून शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तहसीलदारांना निवासस्थानी लाच घेताच अटक करण्यात आली.







यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, गणेश निंबाळकर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !