दिड लाखांची लाच घेताना महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्या


Nets of revenue assistant ACB while taking bribe of half lakhs वाशीम : मानोरा येथील तहसील कार्यालयातील सहायकाला तब्बल दीड लाखाची लाच स्विकारताना एसीबी जाळ्यात अडकला. मानोरा तहसीलमध्ये दोन महिन्यात एसीबीने केलेल्या या दुसर्‍या कारवाईमुळे महसूल विभागातील लाचखोर पुरते हादरले आहेत. अनंत किसन राठोड असे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या सहायकाचे नाव आहे.

शेती नावावरून करण्यासाठी मागितली लाच
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याची ओरड होत असून मागील महिन्यात प्राप्त तक्रारीवरुन एसीबीच्या पथकाने मोहन तिडके व इतर दोघांविरुध्द कारवाई केली. या कारवाईनंतर किमान महसूल प्रशासनातील तरी भ्रष्टाचाराला लगाम लागेल अशी अपेक्षा होती. परंतू वरकमाईची चटक लागलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांकडून लाचेसाठी अडवणुकीचे प्रकार सुरु आहेत. दरम्यान, शेती पुतण्याच्या नावाने करुन देण्याच्या मोबदल्यात महसूल सहायकाने तब्बल दीड लाख रुपये लाचेची मागणी केली. सदर रक्कम देणे मान्य नसल्याने संबधिताना वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.







लाच स्वीकारताच अटक
या तक्रारीची दखल घेत वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या नेतृत्वातील पथकाने पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात लाचखोर सहायक अलगत अडकला. साखरडोह येथील निवासस्थानी सहायक अनंत राठोड याला तक्रारदाराकडून दीड लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी मानोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानोरा तहसील कार्यालयात दोन महिण्यातील दोन कारवायांमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.

यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस अधीक्षक मारूती जगताप, अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके, पोलीस निरीक्षक सुजित कांबळे, विनोद माकंर्डे, नितीन टवलारकार, दुर्गादास जाधव, राहुल व्यवहारे, विनोद अवगळे, योगेश खोटे, रवींद्र घरत, चालक नावेद शेख या वाशीम एसीबीच्या पथकाने केली आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !