कुऱ्ह्याच्या हॉटेल राजवाडामधील सेक्स रॅकेटचा भांडाफोड : तीन परप्रांतीय पिडीत तरुणींची सुटका, सुधारगृहात रवानगी
भुसावळ : कुऱ्हेपानाचे येथील हॉटेल राजवाडामध्ये रविवारी दुपारी पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. हॉटेलचे मालक व व्यवस्थापकांकडून परप्रांतीय तीन युवतींची सुटका करुन त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी हॉटेल मालक संभाजी एकनाथ पाटील (जामनेर) व व्यवस्थापक पंडीत टोंगळे (रा. कुऱ्हे पानाचे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईने उडाली खळबळ
कुऱ्हेपानाचे येथील राजवाडा हॉटेल व लॉजिंगवर पोलिसांनी रविवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान छापा टाकला. या कारवाईत हॉटेल मॅनेजर पंडीत टोंगळे रा. कुऱ्हे पानाचे व मालक संभाजी एकनाथ पाटील रा. जामनेर हे स्वतःच्या फायद्याकरीता पिडीत महिलांना हॉटेलमध्ये बोलवून पैशांचे प्रलोभन देऊन देह व्यापार करण्यास प्रवृत्त करीत होते. पोलिसांनी तिन्ही महिलांना विचारपुस करता त्यांनी सांगितले की, हॉटेलचे मैनेजर व चालक हे आम्हाला बोलावून घेऊन त्यांचकडे समागमासाठी येतात व ते चांगले पैसे देतात त्यांना मिळालेल्या पैशातून ते पैसे आम्हाला देतात. यानुसार दोघांविरुध्द स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनीयम १९५६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल मॅनेजर पंडित टोंगळे ( ५६, कुऱ्हेपानाचे, ता. भुसावळ) व मालक संभाजी एकनाथ पाटील (45 रा.जामनेर) या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. देहविक्री करणाऱ्या तिन्ही परप्रांतीय तरुणींची सुटका करुन त्यांना महिला सुधार गृहात हलविण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सतिष कुलकर्णी, वाहतूक शाखेच्या सहाय्यक फौजदार रुपाली चव्हाण, हवालदार प्रदिप पाटील, अनिल झुंझारराव यांनी ही कारवाई केली.








