चुंचाळे रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन
चुंचाळे : चुंचाळे गाव ते चुंचाळे फाटा रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय व बिकट झाल्यानेहा रस्ता ग्रामस्थांच्या वापरासाठी धोकेदायक बनल्याने या रस्त्याची तत्काळ दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने खळबळ उडाली. चुंचाळे येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक ज्ञानेश्वर पाटील, डी.एम.पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासनास लेखी निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती व रस्त्याचे काम वेळेत न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला मात्र काम न झाल्याने स्वातंत्र्यदिनी रास्ता रोकोे आंदोलन करण्यात आले.
20 जुलै 2023 रोजी जळगाव जिल्हा जिल्हाधिकारी यांना यावल तालुक्यातील विविध शासकीय अधिकारी यांना डी.एम.पाटील यांनी भेटून चुंचाळे गाव ते चुंचाळे फाटा दरम्यानच्या रस्त्याची अवस्था बघून दुरुस्तीची मागणी केली होती.हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो, असे निदर्शनास आणून देण्यात आल होतेे. रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी चुंचाळे येथील डी.एम.पाटील यांनी करूनही दखल घेण्यात न आल्याने शिवसैनिक ज्ञानेश्वर पाटील यांनी प्रशासनाला जागे गेले. मंगळवार, 15 ऑगस्ट रोजी चुंचाळे फाट्यावर आंदोलन सुरू करण्यात आले. गावकरी व परीसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे तडवी यांनी दिले लेखी स्वरूपात आश्वासन देत पावसाळा संपताच कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
यावेळी सरपंच प्रतिनिधी, मुबारक छबु तडवी, माजी सरपंच नत्थु रमजान तडवी, वि.का.व्हा. चेअरमन ईस्माईल तडवी, माजी सरपंच दगडु तडवी, भाजप सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत, वि.का.सो. संचालक, नानाबापु, रवींद्र पाटील, समाधान निळे, शिवाजी गजरे, शिवसेना तालुकाध्यक्ष रवींद्र सोनवणे, रोहिदास महाजन, रमेश लिंगायत, किनगांव, (ऊ.बा.ठा) चुंचाळे योगेश पाटील, रवींद्र सोनवणे, सुपडू संदानशीव, राजु वानखेडे बोराळे माजी उपसरपंच भीमराव वानखेडे, सुकलाल पाटील, साहेबराव पाटील, युवराज पाटील, संदीप पंडित, नयन नेवे, संजय चौधरी, लतीलाल राजपूत, मोहम्मद तडवी, आमीन तडवी, भरत राजपूत, गणेश पाटील, रजनीकांत पाचपोळे, स्वप्निल कोळी आदींची उपस्थिती होती.
