दहा हजारांची लाच घेताना नाशिक आदिवासी विकास प्रकल्प लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात


Nashik Adivasi Development Project accountant caught in ACB’s net while taking bribe of ten thousand नाशिक :  आदिवासी प्रकल्प विभागाकडून थकीत बिले काढून देण्याच्या मोबदल्यात दहा हजारांची लाच मागून ती स्वीकारताना नाशिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे लेखाधिकारी भास्कर रानोजी जेजुरकर (53, हिरावाडी, नाशिक) यांनी शुक्रवारी रात्री नाशिक एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली.

असे आहे लाच प्रकरण
37 तक्रारदार यांचा मालकीचे आंबोली ता.त्र्यंबक जिल्हा- नाशिक येथील गट नं.79/2 व 79/3 मध्ये इमारत क्रमांक 422/1,422/2 असे दोन वसतिगृह आहेत त्यापैकी 422/1 ही 99998/- रुपये मासिक दराने तर 422/2 ही इमारत मासिक 55,088/- रुपये मासिक दराने तक्रारदार यांचे वडिलांनी सन 2021 ते 2024 (3 वर्षाकरीता) शासकीय आश्रमशाळा,आंबोली ता.त्र्यंबक जिल्हा-नाशिक यांना भाडेतत्त्वावर दिलेली आहे. त्यापैकी इमारत क्रमांक 422/1 चे माहे एप्रिल 2023 ते माहे जून 2023 पावेतोचा एकूण घरभाडे दोन लाख 93 हजार 994/- रुपये तसेच इमारत क्रमांक 422/2 चे माहे एप्रिल 2023 ते माहे जून 2023 पावेतोचा एकूण घरभाडे एक लाख 65 हजार 264 रुपये असे दोन्ही इमारतीचे एकूण चार लाख 59 हजार 258 रुपये थकित घरभाडे मिळण्याकरीताची बिले प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक यांच्याकडे पाठविण्यासाठी तेथील लेखा अधिकारी भास्कर रानोजी जेजुरकर यांचेकडे पडताळणी करण्यासाठी प्रलंबित होते. सदरील बिलांची पडताळणी करून प्रकल्प अधिकारी, नाशिक यांच्याकडे मंजुरीकरीता सादर करणेसाठी आलोसे भास्कर जेजुरकर ,लेखा अधिकारी यांनी दि.17 ऑगस्ट 2023 रोजी लाचेची मागणी केली व सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. व मागणी केलेली लाचेची रक्कम आज शुक्रवारी रात्री स्वीकारली.







यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत, पोलीस निरीक्षक संदीप घुगे, प्रभाकर गवळी, संदीप हांडगे व किरण धुळे यांनी हा सापळा यशस्वी केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !