भुसावळात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त कॅमेरा पूजन
Camera worship on the occasion of World Photography Day in Bhusawal भुसावळ : जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून सोनिच्छावाडी भागात शहरातील वरीष्ठ छायाचित्रकांरातर्फे कॅमेर्यांचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी नरसिंग राठोड होते. विकास वाणी, विवेक वणीकर, विलास साळी यांनी द्वीप प्रज्वलन केले. त्यानंतर कॅमेरा पूजन करण्यात आले. शहरातील सर्वात जुने फोटोग्राफर ज्यांनी फोटोग्राफीचा वारसा अजूनही टीकवून ठेवला आहे असे विकास वाणी, विवेक वणीकर, विलास साळी या ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष भुसावळ सिनियर फोटोग्राफर ग्रुपचे नरसिंग राठोड होते. अविनाश साळी, गोकूळ महाजन, श्याम गोविंदा, गणेश राठोड, भरत शिंपी, मुकेश नेवे यांनी सहकार्य केले. सिद्धेश राठोड, पुष्कर शिंपी यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचलन राजेंद्र जावळे तर आभार गोकुळ महाजन यांनी मानले.

शिवाजी कॉम्पेक्समध्येही कार्यक्रम
भुसावळ : शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज संकुलात प्रसिद्धी माध्यमातून छायाचित्रकार बांधवांतर्फे जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त कॅमेरा पूजन करण्यात आले. यावेळी जुन्या व नवीन कॅमेर्यांचे पूजन करण्यात आले. विनोद गोरधे, गोपी म्यांद्रे यांनी कॅमेरा पूजन केले. यावेळी मीडियाचे फोटोग्राफर कमलेश चौधरी, हबीब चव्हाण, संतोष शेलोडे, कालू शहा, कलीम पायलट, वसीम शेख, राहुल वानखेडे, सद्दाम खाटीक, निलेश फिरके, गोपी म्यांद्रे, विनोद गोरधे आदींची उपस्थिती होती. विनोद गोरधे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन हबीब चव्हाण तर आभार कमलेश चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल वानखेडेसह छायाचित्रकारांनी परीश्रम घेतले.
Accordion 1 content…
Accordion 2 content…
