न्हावीतील बेपत्ता बालिकेचा पित्यानेच केला खून : आरोपीला बेड्या

दुर्धर आजाराला कंटाळून चिमुकलीला विहिरीत ढकलल्याची कबुली


The father killed the missing girl in Nawi: the accused is in chains यावल : यावल तालुक्यातील न्हावी गावातील बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय मुलीला जन्मदात्या बापानेच विहिरीत ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी नराधम पित्याला फैजपूर पोलिसांनी मध्यप्रदेशातून बेड्या ठोकल्या आहेत. ठुशा भावलाल बारेला (32) असे संशयित आरोपी पित्याचे नाव असून या घटनेत अनिता बारेला (5) या चिमुकलीचा मृत्यू ओढवला. दरम्यान, मुलीला दुर्धर आजाराला कंटाळल्याने तिला विहिरीत ढकलल्याची कबुली आरोपीने फैजपूर पोलिसांना दिला आहे.

मुलीचा आढळला होता मृतदेह
न्हावी गावातील पाच वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या तीन दिवसांपासून आपल्या वडिलांसोबत घराबाहेर पडल्यानंतर दोघे बेपत्ता झाल्याने शोध सुरू असताना शनिवारी सायंकाळी या पाच वर्षीय अनिताचा मृतदेह गावालगत असलेल्या धीरज सुधाकर चौधरी यांच्या शेत विहिरीत आढळला तर वडिल बेपत्ता असल्याने संशय वाढला होता.







मध्यप्रदेशातून आवळल्या मुसक्या
फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मध्यप्रदेशातील झिरण्याजवळील गुलझरी गावातून रविवारी दुपारी आरोपी पित्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली. मुलीला जडलेल्या दुर्धर आजाराला कंटाळून आपण तिला विहिरीत ढकलून दिल्याचे त्याने कबुली दिल्याने रात्री उशिरा छंडा वेरला बारेला (57, गोणट्या पिपल्या, भगवानपुरा, मध्यप्रदेश) यांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !