काँक्रिट रोड व गटारीचे बांधकाम निकृष्ट यावलला राष्ट्रवादीची तक्रार


यावल : यावल-भुसावळ मार्गावरील काँक्रिट रोड व गटारीचे बांधकाम निष्कृष्ठ दर्जाचे होत असल्याी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्षांनी केली आहे. तक्रारीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभाग, यावल यांना देण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी दिलेल्या निवेदनानुसार, यावल येथील अत्यंत वर्दळीच्या मार्गावर भुसावळ नाक्यापासून सुरू असलेल्या व गटारीच्या कामामध्ये स्थानिक नद्या-नाल्याची माती मिश्रित रेती वापरली जात आहे तसेच या बांधकामामध्ये निविदाप्रमाणे उत्कृष्ट दर्जाची रेती व सिमेंटचे प्रमाण वापरले जात नसल्याने रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे.

रस्ता उखडण्याची भीती
हा रस्ता अत्यंत रहदारीचा असून अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असून अशा प्रकारे गुणवत्ता नसलेला रस्ता तयार झाल्यास तो फार काळ टिकणार नाही तसेच कासवगतीने रस्त्याचे काम सुरू आहे. जड वाहनांसाठी हा रस्ता सध्या बंद करण्यात आल्याने भुसावळकडे जाणार्‍या वाहनांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्वरीत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल व न्यायालयाचा आधार घेऊन दाद मागण्यात येईल, अशा इशाारा देण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !