सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट : निंभोरा पोलिस ठाण्याबाहेर जमावाचा ठिय्या य दोघांविरोधात गुन्हा


Offensive post on social media : A case has been registered against the two who were attacked by a mob outside Nimbhora police station. निंभोरा : रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील अल्पवयीन दोघांनी एका समाजाच्या भावना टाकतील, अशी पोस्ट तयार करीत सोशल मिडीयावर टाकल्यानंतर गावातील तरुणांनी कारवाईच्या मागणीसाठी निंभोरा पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. खिर्डी, निंभोरा, वाघाडी, रेंभोटासह परीसरातील युवक व ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात येवून घोषणाबाजी करून ठिय्या आंदोलन केले. यावेळी आरोपींना तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची अशी मागणी करण्यात आली. फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी जमावास शांतता राखण्याचे आवाहन केल्यानंतर दोघा संशयिताना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

लोकप्रतिनिधींनी केले शांतता राखण्याचे आवाहन
जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष नंदकिशोर महाजन, छोटू पाटील, भैया पाटील, विनोद पाटील, ज्ञानेश्वर महाजन, पवन चौधरी, खिर्डी बु.॥ पोलिस पाटील रीतेश चौधरी, खिर्डी खुर्द पोलिस पाटील प्रदीप पाटील, विवरा खुर्द पोलिस पाटील योगेश महाजन, कांतीलाल गाढे, गुणवंत पाटील, भूषण पाटील, गफूर कोळी, प्रदीप पंजाबी महाराज, किरण महाजन, किरण नेमाडे, धीरज पाटील, किसन महाजन, अतुल पाटील, सोनू पाटील, प्रशांत पाटील, प्रसाद चौधरी, राकेश रायपूरे, नितीन पाटील, सचिन चौधरी, पवन चौधरी, यश चौधरी, महेंद्र कोळी, पूर्वेस बोरसे, स्वप्नील गिरडे आदींनी जमावाला शांततेचे आवाहन केले.



दोन संशयित ताब्यात
आरोपींवर 153 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. तपास फैजपूर पोलिस उपविभागीय अधिकारी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहे. यावेळी रावेर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे, दंगा नियंत्रक पथक जळगाव, पोलिस व होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !