भुसावळ पालिकेची थकबाकी मोहिम : दोन दुकानांना सील, 12 लाखांची थकबाकी वसुल
Bhusawal Municipal Dues Campaign: Two shops sealed, 12 lakhs dues collected भुसावळ : पालिका करासह गाळे भाडे थकल्याने पालिकेने थकबाकी दारांविरोधात बुधवारपासून धडक मोहिम सुरू केली आहे. मोहिमेच्या दुसर्या दिवशी गुरुवारी पंचशील नगरातील डॉ.शर्मा यांच्या टेरेसवरील इंण्डस कंपनीच्या मोबाईल टॉवरला पथकाने सील लावण्यात आले मात्र सायंकाळी थकबाकीची पूर्ण रक्कम भरताच सील काढण्यात आले. मोहिमेच्या दुसर्या दिवशी मालमत्ता कराची पाच लाख 16 हजार सात रुपये तर गाळे भाडे व कराची सहा लाख 58 हजार 316 रुपये वसुली करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोबाईल टॉवरचे थकबाकी भरताच काढले सील
पालिकेला पहिल्या टप्यात 228 मालमत्ता धारकांकडे पाच कोटी 58 लाख 13 हजार 552 रुपयांची थकबाकी वसुल करायची असून वर्षानुवर्षे थकबाकी भरली जात नसल्याने हा आकडा फुगतच चालल्याने पालिकेच्या तिजोरीत खडखडाट होत आहे. प्रांताधिकारी तथा पालिकेेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी पालिकेची गंगाजळी वाढवण्यासाठी एक लाखांवर थकबाकी असलेल्या 228 मालमत्ता व गाळेधारकांची यादी तयार करीत त्यांच्याविरोधात बुधवारपासून धडक मोहिम उघडली आहे. मोहिमेच्या दुसर्या दिवशी गुरुवारी पंचशील नगरात डॉ.शर्मा यांच्या टेरेसवरील मोबाईल टॉवरला सील लावण्यात आले मात्र सायंकाळी उशिरा थकबाकीची पूर्ण रक्कम मिळाल्यानंतर हे सील काढण्यात आले. यावेळी दोन थकबाकीदारांच्या दुकानांना सील लावण्यात आले.

गुरुवारी दिवसभरात मालमत्ता कर, गाळे भाडे व कर थकबाकीपोटी 11 लाख 74 हजार 323 रुपयांची वसंली झाली. प्रशासक जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे उपमुख्याधिकारी शेख परवेज, कर अधीक्षक अनिल आहुजा, प्रशासकीय अधिकारी विष्णू राठोड, आस्थापना प्रमुख वैभव पवार, लिपिक गोपाळ पाली व अनिल भाकरे यांच्यासह 50 कर्मचार्यांनी ही कारवाई केली.


