पाडळसा येथे वाळू चोरीचे पकडलेले ट्रॅक्टर पळवले


At Padalsa, the tractor caught stealing sand was run away यावल : यावल तालुक्यातील पाडळसा येथून कोसगाव जाणार्‍या रस्त्यावर मोर नदीजवळ विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून दोघेजण वाळू चोरी करून नेत असताना तलाठ्यांनी त्यांना पकडले व ट्रॅक्टर तहसील कार्यालयात नेण्याचे सांगितले मात्र दोघांनी ट्रॅक्टरसह ट्रॉली घेवून पळ काढला. याप्रकरणी फैजपूर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
पाडळसा, ता.यावल या गावात तलाठी तेजस विक्रम पाटील हे कोसगाव रस्त्यावर असताना पाडळसा ते कोसगाव रस्त्यावरील मोर नदीच्या पात्रातून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून एक ब्रास गौण खनिज अर्थात वाळू चोरी करून जगदीश नथू कोळी व राहुल युवराज कोळी हे जात असताना तलाठी तेजस पाटील यांनी त्यांना थांबवले आणि ट्रॅक्टर यावल तहसील कार्यालयामध्ये नेण्यास सांगितले मात्र त्यांनी त्यांना न जुमानता ट्रॅक्टर घेऊन पळ काढला. या प्रकरणी तेजस पाटील यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !