भुसावळ तालुका ग्रामपंचायत निवडणूक : सरपंच पदासाठी 16 तर सदस्य पदासाठी 86 अर्ज दाखल


Bhusawal Taluka Gram Panchayat Election : 16 applications filed for the post of Sarpanch and 86 for the post of member भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सात ग्रामपंचातीसाठी निवडणूक तर तीन ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक होत आहे. गुरुवार, 19 रोजी सात ग्रामपंचायतीतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी 16 तर सदस्य पदासाठी 86 अर्ज तसेच तीन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल झाल्याचे तहसीलमधील सूत्रांनी सांगितले.

आज तहसीलला येणार यात्रेचे स्वरूप
भुसावळ तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून तीन ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे. गुरुवारी लोकनियुक्त सरपंचपदासाठी वराडसीम-जोगलखोरी व चोरवड येथील प्रत्येकी दोन, सुनसगाव व फुलगाव प्रत्येकी चार, गोजोरे तीन, अंजनसोंडे एक याप्रमाणे अर्ज दाखल झाला तर सदस्यपदासाठी वराडसीम-जोगलखोरी- 28, सुनसगाव- 20, चोरवड- 8, विल्हाळे- 4, अंजनसोंडे- 3, फुलगाव- 17, गोजोरे- 6 याप्रमाणे 86 अर्ज दाखल झाले. दरम्यान, शिंदी, हतनूर व मांडवेदिगर येथील पोटनिवडणुकीसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरुप येणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !