यावल तालुका ग्रामपंचायत निवडणूक : सरपंच पदासाठी 3 तर सदस्य पदाकरीता 75 अर्ज दाखल


यावल : यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व 9 ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी गुरूवारी लोकनियुक्त सरपंच पदाकरीता 23 तर सदस्य पदाकरीता 75 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असुन अर्ज दाखल करण्याकरीता तहसिल कार्यालयात प्रचंड गर्दी होणार आहे.

यावल तालुक्यात मुदत संपलेल्या 10 ग्रामपंचायतीमध्ये 10 लोकनियुक्त सरपंचांसह 92 सदस्य पदाकरीता सार्वत्रिक निवडणूक होत आहे. विविध कारणाने रीक्त असलेल्या नऊ ग्रामपंचायतीमध्ये एक लोकनियुक्त सरपंचांसह 14 सदस्यांच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. गुरूवारी येथे लोकनियुक्त सरपंच पदाकरीता तब्बल 23 अर्ज दाखल करण्यात आले तर सदस्य पदाकरीता देखील तब्बल 75 अर्ज प्राप्त झाले. सायंकाळी 5.30 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असली तरी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कार्यवाही सुरू होती. तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी जी.टी.सोनवणे, सचिन जगताप, ए.वाय.बडगुजर, एम.पी.देवरे, एम.एच.तडवी, मीना तडवी, बबीता चौधरी, एस.एल.पाटील, एच.एन.तडवी, व्ही.डी.पाटील, एन.पी.वैराळकर, ए.एस.खैरनार, एस.आर.शेकोकार, के.पी.वायसे यांनी अर्ज स्विकारले. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटचा दिवस आहे. अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करण्या करीता गर्दी होण्याची शक्यता आहे.


असे प्राप्त झाले आजवर अर्ज.
साकळी लोकनियुक्त सरपंच दोन, सदस्य दो बोराळे लोकनियुक्त सरपंच 2,सदस्य 6, गाड्र्‍या लोकनियुक्त सरपंच 4, सदस्य 5, बोरखेडा खुर्द लोकनियुक्त सरपंच 3, सदस्य 6, गिरडगाव लोकनियुक्त सरपंच 1, सदस्य 2, किनगाव खुर्द लोकनियुक्त सरपंच 1, सदस्य 13, थोरगव्हाण लोकनियुक्त सरपंच 3, सदस्य 15, म्हैसवाडी लोकनियुक्त सरपंच 3, सदस्य 3, कोळन्हावी लोकनियुक्त सरपंच 4, सदस्य 20.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !