जळगावातील दोन कुविख्यात गुन्हेगार स्थानबद्ध


Two notorious criminals from Jalgaon arrested जळगाव : पोलिस दप्तरी कुविख्यात असलेल्या दोघांवर जिल्हाधिकार्‍यांनी स्थानबद्धतेची कारवाई केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहजाद खान उर्फ लल्ला सलीम खान (25, रा.काट्या फाईल, शनिपेठ) व मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे (31, जळगाव) अशी स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

शहजान खान विरोधात सहा गुन्हे
शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी शहजाद खान याच्यावर वेगवेगळ्या स्वरुपाचे सहा गंभीर गुन्हे दाखल असण्यासह त्याच्यावर तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तरीदेखील त्याच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी त्याच्यावर एमपीडीएचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला. जिल्हाधिकार्‍यांनी प्रस्तावाला मंजुरी देताच गुन्हेगार शहजाद खान याची येरवडा, पुणे कारागृहात रवानगी करण्यात आली.



विकी आलोणे कोल्हापूरात स्थानबद्ध
कुविख्यात गुन्हेगार मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे (31, जळगाव) यास देखील स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिल्यानंतर त्यास कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. आलोणे विरोधात गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत. यात खूनाचा प्रयत्न, दरोड्या प्रयत्न, जीवेठार मारण्याची धमकी, नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणे, जुगार खेळणे असे वेगवेगळे स्वरूपाचे गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील कोणतीही बदल झाला नसल्याने रामानंद निरीक्षक शिल्पा पाटील यांनी एमपीडीए करण्याच्या कारवाईसाठी प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना पाठवल्यानंतर अवलोकनानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला.

कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पारीत केल्यानंतर रामानंद नगर पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, एलसीबीचे हवालदार सुनील दामोदरे, पो.ना. रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी, रवींद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, इरफान मलिक, किरण पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील यांनी मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे याला अटक करून कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले.

वरीष्ठ अधिकार्‍यांचे मार्गदर्शन
या प्रस्तावासाठी पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !