ताबा सुटल्याने पिकअप उलटून धुळ्यातील महिला ठार
A woman in Dhule was killed when the pickup overturned after losing control धरणगाव : ओव्हरटेक करण्याच्या नादात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी पिकअप उलटल्याने धुळ्यातील महिलेचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी सोमवार, 30 ऑक्टोबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेचा जागीच मृत्यू
बदरे आलम शमीम मोहम्मद शहा (40, धुळे) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. सोमवार, 16 ऑक्टोबर रोजी ते आपली बहिण सारजान बानो अजीज अहमद शाह, पत्नी साफिया व मुलांसोबत चारचाकी पिकअप वाहन (क्रमांक एम.एच. 19 सी.वाय. 9741) ने जळगाव येथून धुळे येथे जाण्यासाठी निघाले असता वाहन हे धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावाजवळून महामार्गावरून जात असतांना रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप गाडी रस्त्यावर पलटी झाली.


पोलिसात चालकाविरोधात गुन्हा
या अपघातात सारजान बानो अजिज अहमद शाह या महिला गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर इतर सर्वजण गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर अखेर सोमवार, 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता पिकअप वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विठ्ठल पाटील करीत आहे.