जळगावातील 34 वर्षीय महिलेचा विनयभंग : कुटूंबालाही मारहाण


34-year-old woman molested in Jalgaon : Family also beaten जळगाव : वयोवृद्धाने किरकोळ वादातून महिलेचा विनयभंग करीत कुटूंबाला मारहाण केली. ही घटना शहरातील खान्देश मिल कॉलनी परीसरातील एका भागात घडली. याप्रकरणी सोमवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

धक्काबुक्की करीत मारहाण
जळगाव शहरातील खान्देश मिल कॉलनी परीसरातील एका भागात 34 वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्याच भागातील संशयित आरोपी नारायण गोपाल (65) याने कारण नसतांना महिलेला अश्लिल शिवीगाळ करत विनयभंग केला. तसेच महिलेसोबत धक्काबुक्की करत तिच्या कुटुंबाला मारहाण केली.



महिलेने याप्रकरणी सोमवार, 30 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता जिल्हापेठ पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिसात नारायण गोपाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !