केळी पीक विमा व 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश


Deposit banana crop insurance and 25 percent advance compensation in farmers’ bank accounts before Diwali : Collector Ayush Prasad orders जळगाव : गत वर्षातील केळी पीक विम्याची व या वर्षातील 27 महसूल मंडळातील 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या.

तक्रार अर्जांवर सुनावणी
जिल्ह्यातील प्रलंबित पीक विम्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त तक्रार अर्जांवर आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सुनावण्यात घेण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी राहुल पाटील, ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यातील 2022-23 अंतर्गत केळी पिकांचे नुकसान भरपाई बाबतचा परीपूर्ण प्रस्ताव तयार करून अप्पर मुख्य सचिव (कृषी), मंत्रालय, मुंबई यांच्याकडे पाठपुरावा करून दिवाळीपूर्वी विमा कंपनीने शेतक-यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा करावी.

प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेत 2023-24 साठी जळगाव जिल्ह्यातील 27 महसूल मंडळात 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाईची अधिसूचना यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. कंपनीचे सर्व आक्षेप यापूर्वीच नाशिक विभागीय आयुक्तांनी फेटाळले आहेत. 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाईची रक्कम ही दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !