फैजपूरातील 40 वर्षीय तरुणाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू
A 40-year-old man from Faizpur died after falling under the train जळगाव : जळगाव तालुक्यातील सावखेडा रेल्वेपुलाजवळ धावत्या रेल्वेखाली फैजपूरातील 40 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. सुरूवातीला अनोळखी असलेल्या या तरुणाची नंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख पटली. फिरोज रज्जाक तडवी (40, फैजपूर, ह.मु. हरीविठ्ठल नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
मिस्तरी काम करणार्या तरुणाची आत्महत्या
यावल तालुक्यातील फैजपूर येथील रहिवाशी फिरोज रज्जाक तडवी हे आपल्या पत्नी व तीन मुलांसोबत जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात वास्तव्याला होते. बांधकाम मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. जळगाव ते शिरसोली दरम्यान गिरणा पंपिंग रस्त्यावरील सावखेडा पुलाजवळ खांबा क्रमांक 415/08 जवळ धावत्या रेल्वेच्या समोर आल्याने फिरोज तडवी यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 31 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली होती. सुरूवातील अनोळखी म्हणून जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.


तपासाधिकारी हवालदार लिलाधर महाजन यांनी सोशल मिडीयावर या घटनेबाबत माहिती देत ओळख पटवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांनी गुरूवार, 2 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेवून मयत तरूण हा फिरोज तडवी असल्याचे निष्पन्न केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे