चोरट्यांची हात की सफाई : धरणगावात सेवानिवृत्त शिक्षकाच्या पिशवीतून 25 हजार लांबवले


Cleaning the hands of thieves : 25,000 was recovered from the bag of a retired teacher in Dharangaon धरणगाव : सेवानिवृत्त शिक्षकाच्या कापडी पिशवीला ब्लेड मारून 25 हजारांची रोकड लांबवण्यात आली. हा प्रकार गुरुवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास धरणगाव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडीया बँकेजवळ घडला. याप्रकरणी रात्री आठ वाजता धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाळत ठेवून चोरीचा संशय
धरणगाव तालुक्यातील हिंगोली खुर्द येथे राहणारे सेवानिवृत्त शिक्षक सुरेश रामचंद्र महाजन (73) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे पेन्शनचे पैसे घेण्यासाठी ते गुरुवार, 2 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता धरणगाव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत आले होते.



त्यावेळी बँकेतून त्यांनी 25 हजार रुपये काढून एका कापडी पिशवीत टाकले व रस्त्याने पायी जात असताना अज्ञात चोरट्याने धारदार वस्तूने त्यांची कापडी पिशवी कापून 25 हजार रुपयांची रोकड लांबवत पळ काढला. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सेवानिवृत्त शिक्षक सुरेश महाजन यांनी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला. तपास सहाय्यक फौजदार रामदास पावरा करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !