धरणगाव तालुक्यातील विवाहितेचा विनयभंग
Rape of a married woman in Dharangaon taluka धरणगाव : धरणगाव तालुक्यातील 25 वर्षीय विवाहितेचा मध्यरात्री विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयिताविरोधात गुन्हा दाखल
धरणगाव तालुक्यातील एका गावात 25 वर्षीय विवाहिता कुटूंबासह वास्तव्यास आहे. पीडीता घरात झोपलेली असतांना रात्री 11 वाजेच्या सुमारास संशयित रीतेश राजेंद्र पाटील याने मागच्या दरवाजाने घरात प्रवेश केला. त्यानंतर पीडीतेसोबत अश्लील वर्तन करीत स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाईल, असे कृत्य करीत विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक कृषीकेश रावले करीत आहेत.








