अरे दिवानो…मुझे पहचानो…. जळगाव पोलिसांना गुंगारा देणारा डॉन पाच वर्षानंतर जाळ्यात
The don who gave a boost to the Jalgaon police is in the net after five years जळगाव : दरोड्याच्या गुन्ह्यात पाच वर्षांपासून गुंगारा देणारा कुविख्यात आरोपी प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके (24, रा.उल्हासनगर, जि.ठाणे) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना पाहताच आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला मात्र तो व्यर्थ ठरला.
ठाणे व पालघरात मोठे दरोडे
प्रथमेश उर्फ डॉन याने ठाणे व पालघर येथे मोठे दरोडे टाकले आहे. दरोडा टाकल्यानंतर मुद्देमाल घेवून संशयित प्रथमेश हा पसार होण्यात यशस्वी होत होता. त्याच्याविरुद्ध राज्यासह इतर राज्यातदेखील दरोड्यासह इतर वेगवेगळे 16 गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ठाणे, पालघर पोलिसांसह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे पोलिस त्याचा शोध घेत होते.






गोपनीय माहितीवरून कारवाई
प्रथमेशचे काही नातेवाईक जळगावात राहतात त्यामुळे तो जळगावात आला असून सिंधी कॉलनीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथक तयार आले. त्यानंतर प्रथमेश उर्फ डॉनला शिताफीने अटक करण्यात आली. सिंधी कॉलनीत संशयित प्रथमेश हा फिरत असतांना पथकातील पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रुपाली महाजन, जिल्हा विशेष शाखेचे सहायक फौजदार दिनेश बडगुजर, पअमित मराठे, पोलिस नाईक जुबेर तडवी हे पोहचले. पोलिसांना बघताच संशयित प्रथमेशने तेथून पळ काढला.
अडीच किमीपर्यंत पाठलाग करीत घेतले ताब्यात !
पोलिसांच्या पथकाला बघताच आता पोलिस आपल्याला ताब्यात घेणार याची कुणकुण लागताच प्रथमेश हा तेथून पळाला परंतु पथकाने त्याचा अडीच किलोमीटरपर्यंत पळत जाऊन पाठलाग केला. त्यानंतर त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. त्याला ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पोळ यांच्या ताब्यात दिले आहे.


