जळगावातील संभाजी नगरात धाडसी घरफोडी : दोन लाखांचा मुद्देमाल लांबवला


Audacious house burglary in Sambhaji Nagar of Jalgaon : Two lakh worth of valuables were recovered जळगाव : घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधून एक लाख 84 हजार 500 रुपयांचा ऐवज संभाजी नगरातून लांबवला. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे पंडित तुळशीराम माळी (50, संभाजीनगर, जळगाव) हे जळगाव जळगाव तालुक्यातील पाथरी या आपल्या मूळ गावी कुटुंबीयांसह गेल्याने चोरट्यांनी संधी साधली. 330 हजारांसह साडे नऊ तोळ्याचे दागिने लांबवण्यात आले. चोरीचा प्रकार शनिवार, 4 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आला.

बंद घरे चोरट्यांना पर्वणी
जळगाव तालुक्यातील पाथरी येथील मूळ रहिवासी असलेले पंडित माळी हे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरीला असून कुटुंबीयांसह जळगावातील संभाजीनगर परीसरात राहतात. पाथरी ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने ते कुटुंबीयांसह गावी गेले होते. शुक्रवार, 3 नोव्हेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व रोख 30 हजार रुपयांची रक्कम, साडे नऊ तोळ्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला. शनिवार, 4 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता माळी यांच्या पत्नी घरी आल्यानंतर घरफोडी उघडकीस आली. पंडीत माळी यांनी रामानंद नगर पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !