भुसावळनजीक भीषण अपघात : एस.टी.बसच्या धडकेत असोद्यातील दुचाकीस्वार जागीच ठार
Fatal accident near Bhusawal : Bike rider from Asoda killed on the spot in collision with ST bus भुसावळ : भरधाव एस.टी.बसने पाठीमागून दिलेल्या धडकेत असोद्यातील दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर सोबत असलेली 60 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील साकेगाव गावाजवळील वाघुर नदीवरील पूलावर घडला. रविवार, 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. भुसावळ तालुका पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक
भुसावळ तालुक्यातील साकेगाव जवळील वाघुर नदीच्या पुलावर बसने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत असोद्यातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेली 60 वर्षीय महिला गंभीररीत्या जखमी झाली. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. दुचाकी बसच्या मागच्या चाकात आल्याने तिचा चुराडा झाला. जखमी झालेल्या महिलेला तातडीने नजीकच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले






दरम्यान या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यावेळी भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. अपघातग्रस्तांना हलवण्यासाठी 108 क्रमांकाला वारंवार फोन करूनही रुग्णवाहिका आली नाही तर राष्ट्रीय महामार्गाच्या रुग्णवाहिकेने जखमींना हलवण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


