महिलांनो तुम्ही वापरत असलेली सौंदये प्रसाधने नकली तर नाही ना ? : जळगावात लाखभराची बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त
भुसावळसळ-जळगावातील तिघांविरोधात गुन्हा : एक लाखांची बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त
Fake cosmetics worth lakhs seized in Jalgaon जळगाव : महिलांनो तुम्ही वापरत असलेली सौंदर्य प्रसाधने नकली तर नाही ना ? कारण जळगावात हिंदुस्थान लिव्हर कंपनीच्या नावाने बनावट सौंदर्य प्रसाधने तयार करून त्यांची विक्री करणार्या फुले मार्केटमधील दोन दुकानांमध्ये तपासणी केल्यानंतर तेथे 99 हजार 698 रुपयांचे बनावट उत्पादने आढळली आहे. त्रिकूटाविरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
फुले मार्केटमध्ये हिंदुस्थान लिव्हर कंपनीच्या नावाने बनावट सौंदर्य प्रसाधने असल्याची माहिती मिळाल्यावरून कंपनीच्या अधिकार्यांनी सोमवार, 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता साईश्रद्धा नॉवेल्टी, जय अम्बे कॉस्मेटीक या दुकानांमध्ये तपासणी केली. त्यावेळी तेथे बनावट सौंदर्य प्रसाधनांवर हिंदुस्थान लिव्हर कंपनीचे नाव वापरून त्याची विक्री केली जात असल्याचे स्पष्ट झाले. कंपनीची हुबेहुब उत्पादने तयार करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे आढळून आल्याने 99 हजार 698 रुपयांचे बनावट उत्पादने जप्त करण्यात आली.


या प्रकरणी कंपनी अधिकारी नयनतारा डेव्हिड डेमी (रा.बंगलुरू, कर्नाटक) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून संतोष अरुण देवरे (36, रा.कांचननगर), जगदीश गुलाबराव नागदेव (32, रा.भुसावळ), विशाल कमलकुमार ढिंगवाणी (24, रा.कंवरनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करीत आहेत