अमळनेर शहरात बसमध्ये चढताना चोरट्याने 60 हजारांची बांगडी लांबवली
While boarding a bus in Amalner city, the thief stole a bangle worth 60 thousand अमळनेर : दिवाळी सणामुळे बसेसला वाढलेली गर्दी चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडली आहे. अमळनेर बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना वृध्देची 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची बांगडी लांबवण्यात आली. . याप्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गर्दीत चोरटे शिरजोर
आशाबाई हिरालाल चौधरी (66, कळमसरे, ता.अमळनेर) या वृध्द महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने त्या महिला अमळनेर शहरात आलेल्या होत्या. मंगळवार, 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता बसस्थानक आवारात असतांना शिंदखेडा-जळगाव या बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळील 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची बांगडी लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर अमळनेर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार प्रमोद पाटील करीत आहेत.

