जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 67 महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परीस्थिती जाहीर

मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची माहिती


Drought-like situation announced in 67 revenue boards in 14 talukas of Jalgaon district जळगाव : जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 67 महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार्‍या सर्व सवलती लागू होणार असल्याची माहिती मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

यांची बैठकीला उपस्थिती
मंत्रालयातील वॉर रूम येथे गुरुवारी मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्री मंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी या बैठकीला मंत्रीमंडळ उपसमितीचे सदस्य सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपानराव भुमरे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधानसचिव सोनिया सेठी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, कृषी विभागाचे सचिव सुनिल चव्हाण, वित्त विभागाचे सहसचिव वि.र.दहिफळे, पाणीपुरवठा विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख,मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, जलसपंदा विभागाचे सहसचिव संजय टाटू यावेळी उपस्थित होते.


67 महसुली मंडळात दुष्काळसदृश परीस्थिती
जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 67 महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परीस्थिती जाहीर करण्यात आली असून जळगाव तालुक्यातील जळगाव, भोकर, म्हसावद, नशिराबाद, असोदा, पिंप्राळा महसूली मंडळामध्ये, तालुका जामनेर महसूली मंडळामध्ये जामनेर, पहुर, शेंदुर्णी, वाकडी, मालदाभाडी, नेरी, तोंडापूर महसूली मंडळामध्ये, तालुका एरंडोलमध्ये एरंडोल, उमरदे (रिंगणगाव), कासोदा, उत्राण महसूली मंडळामध्ये, तालुका धरणगावमध्ये धरणगाव, सोनवद, पाळधी, पिंपरी खुर्द, साळवा, नवनिर्मित पद महसूली मंडळामध्ये, चांदसर तालुका भुसावळमध्ये भुसावळ, वरणगाव, कुर्‍हे प्र.नृ, पिंपळगाव महसूली मंडळामध्ये, तालुका बोदवडमध्ये बोधवड, करंजी नवनिर्मित पद महसूली मंडळामध्ये, तालुका यावलमधील भालोद, किनगाव, साकळी, फैजपूर, बामणूद महसूली मंडळामध्ये, तालुका रावेरमधील खिरडी, निभोंरा बुद्रुक महसूली मंडळामध्ये, तालुका मुक्ताईनगरमधील मुक्ताईनगर, अंतुर्ली, घोडसगाव महसूली मंडळामध्ये, तालुका पाचोरामधील पाचोरा, नगरदेवळा, गाळण, पिंपळगाव हरेश्वर, कु-हाड, वरखेड बुद्रूक महसूली मंडळामध्ये, तालुका भडगांव मधील भडगाव, कांजगाव (गोंडगाव), आमडदे, कोळगाव महसूली मंडळामध्ये, तालुका अमळनेरमधील अमळनेर, पातोंडा, भरवस, मारवड, अंमळगाव, शिरूड, वावडे महसूली मंडळामध्ये, तालुका चोपडामधील चोपडा, आडावत, गोरगावले बु,चहाडा, धानोरा प्र.य., लासुर महसूली मंडळामध्ये, तालुका पारोळामध्ये बहादरपूर, घोरवड, शेवाळे बुद्रुक महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. आगामी कालावधीतही दुष्काळसदृश्य परीस्थिती लक्षात घेवून उर्वरीत भागासाठी निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !