दुधाची पिशवी घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीस पळविले
A minor girl who went to buy a bag of milk was abducted जळगाव : दुधाची पिशवी घेण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फुस लावुन पळवून नेल्याची घटना शहरातील एमआयडीसी परीसरात 29 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8.30 वाजता घडली. याप्रकरणी बुधवार, 8 रोजी तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली.
अल्पवयीन मुलीचे कुटुंब मुळ सावरला (ता.जामनेर) येथील असून उदरनिर्वाहसाठी हे कुटुंब एमआयडीसी परीसरात एका कामाला आहे. कंपनीच्या लेबर रुममध्ये ते वास्तव्यास आहेत. अल्पवयीन मुलगी दुधाची पिशवी घेण्यासाठी सकाळी घराबाहेर पडली असता अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविले. या प्रकरणी तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे करीत आहेत.

