चाळीसगावकरांना ‘दीपावली’ पावली ; आमदार मंगेश चव्हाणांच्या प्रयत्नांनी 20 कोटींच्या रस्त्यांना मंजुरी
20 कोटींचे रस्ते मंजूर ः दयानंद जवळील तिीतूर नदीवरील पूल, कोर्ट ते बाजार समिती पर्यंतच्या काँक्रीट रस्त्याचे टेंडर देखील निघाले
‘Deepawali’ was celebrated by the people of Chalisgaon ; Roads worth 20 crores approved due to MLA Mangesh Chavan’s efforts चाळीसगाव : गेल्या अनेक वर्षांपासून खराब रस्त्यांचा त्रास सहन करणार्या चाळीसगाव वासीयांची समस्या अखेर कायमची दूर होणार आहे. चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी 20 कोटी रुपयांचा निधी नवीन रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर झाला आहे. त्यात शहरातील महत्वाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चाळीसगाव रेल्वे स्टेशन या कामासाठी 6 कोटी, प्रभाग क्र.1 मधील शिवपार्वती नगर, रामकृष्ण नगर, माधव नगर, शिवाजी नगर येथील अंतर्गत रस्त्यांना एकूण 9 कोटी रुपये निधी, प्रभाग क्र.9 मधील हिरापूर रोड ते सुयश लॉन्स परीसरातील रस्त्यांना पाच कोटी निधी मंजूर झाला आहे.
चाळीसगावकरांना दीपावलीची आमदारांकडून भेट
त्यात आनंदाची बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वीच मंजूर झालेल्या दयानंद जवळील तितुर नदीवरील पूल तसेच कोर्ट, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते थेट बाजार समिती पर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे 16 कोटींचे टेंडर देखील प्रकाशित झाल्याने आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव शहर वासीयांना दिवाळी भेटच दिली आहे.


शहरातील रस्ते होणार चकाचक : आमदार मंगेश चव्हाण
लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने चाळीसगाव शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. चाळीसगाव शहरातील महत्वाच्या रस्त्याच्या कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत. येणार्या काळात अजून भरीव निधी आणून शहरातील रस्ते चकाचक करण्याचा संकल्प केला आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे.





