आमदार अपात्रता प्रकरण : राहुल नार्वेकर स्पष्टच म्हणाले ; फटाके फुटण्यास अद्याप अवकाश
MLA disqualification Case : Rahul Narvekar Clearly Said ; Still time for Fireworks मुंबई : राज्यातील आमदार अपात्रता प्रकरणाकडे राज्यातील नागरीकांचे लक्ष लागून असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रता प्रकरणाबाबत मोठे विधान केले आहे. माध्यमांशी बोलताना नार्वेकर म्हणाले की, फटाके फुटायला अद्याप अवकाश आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांचा प्रश्न 31 डिसेंबरपर्यंत सोडविण्याचे आदेश दिल्यानंतर याबाबत आता काय निर्णय लागणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
कुलाब्यात दिवाळी साजरी
नार्वेकर म्हणाले की, दीपोत्सव सर्वांच्या आयुष्यात प्रकाश आणेल. सर्वांसोबत सर्वांचा विकास हे भाजपचे ध्येय आहे. या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी कुलाबा येथे दिवाळी साजरी करण्यात आल्याचे नार्वेकर म्हणाले.


आमदार अपात्रच्या सुनावणीवर पत्रकारांनी विचारले असता, राजकीय फटाके नेहमीच फुटत असतात. फटाके फुटायला अजून वेळ आहे. काळजी करू नका, असे नार्वेकर म्हणाले. संविधानात ज्या तरतुदी आहेत, त्याच पालन करून कायद्यानुसार निर्णय आपण घेऊ, असे संकेत नार्वेकर यांनी दिले.





