लोखंडी आसारी छातीत शिरल्याने एरंडोल शहरातील दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

जमाव संतप्त : दोषी ठेकेदारावर कारवाईची मागणी


A 10-year-old boy from Erandol town died due to an iron bar entering his chest एरंडोल : दहा वर्षीय चिमुकल्याच्या शरीरात खेळताना गटारीवरील आसारी छातीत शिरल्याने चिमुकल्याचा मृत्यू ओढवला. ही दुर्दैवी घटना शहरातील हिमालय पेट्रोल पंपामागील परीसरात नगरपालिकेच्या एका बांधकामाच्या ठिकाणी सोमवार, 13 रोजी संध्याकाळी घडली. या घटनेनंतर नातेवाईकांसह नागरीक आक्रमक झाले असून दोषी ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली. विशाल रवींद्र भील (10, हिमालय पेट्रोल पंपामागे, एरंडोल) असे मयताचे नाव आहे.

ढापे बनवण्याची आसारी शिरली छातीत
विशाल हा आई, वडील, लहान भाऊ-बहिण यांच्यासह वास्तव्याला होता. हातमजुरी करून त्याचा परीवार उदरनिर्वाह करतो. एरंडोल नगरपालिकेतर्फे हिमालय पेट्रोलपंपामागे गटारीचे ढापे टाकण्यासाठी कंत्राट देण्यात आले आहे मात्र काही आसार्‍या धोकादायक स्थितीत ठेवलेल्या असतानाच सोमवारी सायंकाळी खेळत असलेल्या विशालच्या शरीरात आसारी शिरल्याने त्याचा मृत्यू झाला. स्थानिक नागरीकांनी धाव घेत त्याला खाजगी रुग्णालयात उपचाराला नेले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मयत घोषित केले.



कुटुंबीयांनी मुलाच्या मृत्यूची वार्ता ऐकून आक्रोश केला. ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे घटना घडल्याने दोषींवर कारवाईसाठी नागरीक आक्रमक झाले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !