जामनेरच्या विवाहितेची बसमध्ये चढताना मंगलपोत लांबवली


Jamner’s wife was delayed by Mangalpol while boarding the bus जळगाव : बसमधील वाढत्या गर्दीचा फायदा घेत भामट्याने जामनेर येथे जाण्यासाठी बसमध्ये चढणार्‍या महिलेच्या गळ्यातील 20 हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत लांबवली. याप्रकरणी सोमवार, 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांची ‘दिवाळी’
प्रतिभा सुभाष परखड (48, गिरीजा कॉलनी, जामनेर) या महिला आपले पती यांच्यासह वास्तव्याला आहे. शनिवार, 11 नोव्हेंबर रोजी प्रतिभा परखड या महिला त्यांचे भाऊ राजेश पाटील यांच्यासोबत दिवाळी खरेदीनिमित्त जळगाव शहरात आल्या होत्या. खरेदी झाल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास प्रतिभा परखड या महिला त्यांचे भाऊ राजेश पाटील यांच्यासोबत जामनेर येथे जाण्यासाठी जळगाव ते कोर्‍हाडा बस लागली होती. त्यावेळी बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लांबवली.



सोमवार, 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हा पेठ पोलिसात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !