जळगावात 26 वर्षीय रुग्ण विवाहितेचा वॉर्ड बॉयकडून विनयभंग


26-year-old married patient molested by ward boy in Jalgaon जळगाव : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एका गावातील 26 वर्षीय विवाहितेचा एका रुग्णालयात वॉर्डबॉयने विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता घडला. याप्रकरणी संशयित निलेश ज्ञानेश्वर बाविस्कर (जळगाव) याच्याविरोधात जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा
जळगाव शहराच्या जिल्हापेठ पोलिस स्टेशन हद्दीतील एका दवाखान्यात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एका गावातील 26 वर्षीय विवाहिता आरोग्य संतुलनासाठी एका दवाखान्यात उपचार घेत असून मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता दवाखान्यातील निलेश बाविस्कर याने महिलेस उपचाराची गरज नसतांना तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. तपास हवालदार वंदना राठोड करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !