बलवाडीतील रखवालदाराच्या खुनाची अखेर उकल : सालदारासह दोघांना बेड्या

जळगाव गुन्हे शाखेकडून खुनाच्या गुन्ह्याची उकल ः दोघा आरोपींना बेड्या


The murder of the security guard in the fort is finally solved : both of them, including the security guard, are in chains जळगाव : शेतासह शेती साहित्याची रखवाली करण्यासाठी आलेल्या बिलवाडीतील 52 वर्षीय रखवालदाराचा खून करीत ट्रॅक्टर लांबवण्यात आल्याची घटना जळगाव तालुक्यातील वावडदा ते म्हसावद दरम्यान वावडदा शिवारात घडली होती. या घटनेत पांडुरंग पंडित पाटील (52, बिलवाडी) यांचा खून करण्यात आला होता. जळगाव गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल करीत सालदारासह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पवन बहाधीर बारेला (30, वाघाड, ता.राजापूर, जि.बडवाणी) व बाथरसिंग शोभाराम बारेला (24, सालीकल, सालीतांडा, ता.राजापूर, जि.बडवाणी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

डोक्यात लोखंडी वस्तू मारून केला खून
रखवालदार पांडुरंग पंडित पाटील (52, बिलवाडी) हे बिलवाडी येथीलच रहिवासी ईश्वर मन्साराम पाटील यांचे वावडदा ते म्हसावद दरम्यान असणार्‍या शेतामध्ये रखवालदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मंगळवार, 14 नोव्हेंबर रोजी ते शेतामध्ये रखवालदारी करण्यासाठी रात्री गेले असता मध्यरात्री पवन बहाधीर बारेला (30, वाघाड, ता.राजापूर, जि.बडवाणी) व बाथरसिंग शोभाराम बारेला (24, सालीकल, सालीतांडा, ता.राजापूर, जि.बडवाणी) यांनी शेतात प्रवेश करीत रोटोव्हेटर व ट्रॅक्टर चोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर रखवालदार पांडुरंग पाटील यांना जाग आली व त्यांनी विरोध केला व दरोडेखोरांनी डोक्यात लोखंडी वस्तू मारून त्यांचा खून केला.



ट्रॅक्टर बंद पडताच दुचाकीवरून काढला पळ
दोघा आरोपींनी ट्रॅक्टरसह रोटाव्हेटर घेवून पळ काढला मात्र रस्त्यातच ट्रॅक्टर बंद पडल्यानंतर त्यांनी दुचाकीने लालीतांडा येथे सासरी पळ काढला तर बुधवारी पहाटे सहा वाजता शेतमालक ईश्वर पाटील यांचा मुलगा राजेंद्र ईश्वर पाटील हा म्हशीचे दूध काढण्यासाठी शेतात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गावातील पोलीस पाटील सुवर्णा उंबरे आणि पोलिसांना याबाबत माहिती कळवल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना माहिती कळवण्यात आली. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे व इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मय पांडुरंग पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. पांडुरंग पाटील यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आला. यावेळी कुटूंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हा जळगाव एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, हवालदार जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, प्रीतम पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भारत पाटील, संदीप सावळे, ईश्वर पाटील, लोकेश माळी आदींच्या पथकाने या गुन्ह्याची उकल केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !