मोबाईल दुकानदारावर दोन जणांकडून चॉपरने वार


A mobile shopkeeper was attacked by two persons with a chopper जळगाव : जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परीसरातील एका मोबाईल दुकानदाराला दोघांनी चॉपरने वार करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

दोघांविरोधात गुन्हा दाखल
सुमित वसंतलाल वलबानी (31, सिंधी कॉलनी, जळगाव) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. मोबाईल दुकान लावून आपला उदरनिर्वाह चालवतो. मंगळवार, 14 नोव्हेंबर रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास सुमित बलबानी हा त्याच्या घरासमोर उभा असताना रात्रीच्या वेळेस कॉलनीत दोघे फिरत होते. त्यावेळी विनाकारण काय फिरता असे सुमितने विचारल्याचा राग आल्याने संशयित आरोपी आर्यन पवार (शनिपेठ) आणि नासीर खान या दोन जणांनी चॉपरने वार करून सुमितला जखमी केले.



हा प्रकार घडल्यानंतर सुमितला तातडीने खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, सुमित वलबानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !