परीक्षेचे हॉल तिकीट घेण्यास गेलेल्या भुसावळच्या युवकाचा पहूरमध्ये हृदयविकाराने मृत्यू


A youth from Bhusawal who went to buy the hall ticket for the examination died of heart attack in Pahoor भुसावळ :  शहरातील अमरनाथ नगरातील रहिवासी हर्ष सतीश बाणाईत (19) हा पहूर येथील राजकुवर कॉलेजला हॉल्ट तिकीट घेण्यास गेला असता तेथेच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली.

अमरनाथ नगरातील रहिवासी असलेले सतीश बाणाईत याचा अष्टभुजा देवीच्या मंदीरासमोर हेअर कटींग सलूनचा व्यवसाय आहे. त्यांना दोन मुले आहे. त्यातील मोठा मुलगा हर्ष याने पहूर येथील राजकुवर कॉलेजमध्ये एस.वाय.बी.कॉमला प्रवेश घेतला होता. तो शुक्रवारी दुपारी एक वाजता मित्र रडे याच्या सोबत मोटर सायकलने पहूर येथे गेला. तेथे दुपारी 2.15 वाजता पोहोचल्यावर कॉलेजमध्ये असतांनाच त्याने सोबत असलेल्या मित्र रडे याला मला अ‍ॅसिडीचा त्रास होत आहे, छाती दुखत आहे, असे सांगितले आणि त्याला चक्कर येत तो खाली कोसळला. त्याला तात्काळ पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केल्यानंतर मित्र रडे याने भुसावळातील नातेवाईकांना माहिती कळवली.



भुसावळचे मित्र पहूरला रवाना
भुसावळ येथे हर्ष याच्या मृत्यूची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नितीन धांडे आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी तत्काळ पहूर येथे धाव घेतली. पहूर येथे ग्रामीण रुग्णालयात हर्ष याचे शवविच्छेदन करण्यात आले. तेथून रात्री सात वाजता मृतदेह भुसावळ येथे आणल्यानंतर रात्रीच हर्षवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक झालेल्या या घटनेमुळे बाणाईत कुटुंबावर मोठाच दुखाचा डोंगर कोसळला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !