लेखक नामदेवराव जाधव यांच्यावर हल्ला : तोंडाला फासले काळे
Attack on writer Namdevrao Jadhav : Black on the face पुणे : शरद पवार हे मराठा नसून ओबीसी आहेत, असा खळबळजनक दावा लेखक नामदेवराव जाधव यांनी करीत सातत्याने शरद पवारांना टार्गेट केले होते. शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठ्यांना ओबीसीत न टाकता इतर समुदायाला ओबीसीत समावेश करण्याचा जीआर काढला होता. त्यामुळे मराठ्यांचे नुकसान झाल्याचदेखील जाधव म्हणाले होते. यावरून संतापलेल्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेवराव जाधवांवर हल्ला करत त्यांच्या तोंडाला काळं फासल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे
घोषणाबाजी करीत फासले काळे
पुण्यात नामदेवराव जाधव माध्यमांशी बोलताना हा प्रकार घडला. शरद पवारांवर चुकीचे विधान केले म्हणून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले व यापुढे पवारांविरोधात जो बोलेल त्यांना आम्ही सोडणार नाही असं संतप्त कार्यकर्त्यांनी म्हटलं. एका पोलिसाने जाधवांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला परंतु कार्यकर्त्यांनी बळजबरीने जाधवांना काळे फासले.







