चोपडा-अडावद रस्त्यावर रस्ते अपघातात अनोळखीचा मृत्यू


An unidentified person died in a road accident on Chopra-Adavad road जळगाव : रस्ता अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या अनोळखीचा सोमवार, 20 रोजी रात्री मृत्यू झाला. चोपडा-अडावद रस्त्यावर बेशुध्दावस्थेत असलेल्या अंदाजे 35 वर्षीय अनोळखी तरुणाला 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषीत केले.

रामानंदनगर पोलिसांनी मंगळवार 21 पंचनामा केला. ओळख पटवून नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !