चाळीसगाव तालुक्यातील 19 वर्षीय तरुणीवर 50 वर्षीय प्रौढाचा बलात्कार

व्हिडिओ व्हायरल करण्याचा धाक दाखवत दुसरे लग्नही मोडले


A 19-year-old girl was raped by a 50-year-old man in Chalisgaon taluka चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 19 वर्षीय तरुणीवर 50 वर्षीय प्रौढाने शेतातील घरात नेत अत्याचार केला व त्यानंतर चाळीसगावात पीडीता कॉलेजला आल्यानंतर पुन्हा तिच्याशी लॉजवर जावून अत्याचार केला व त्याबाबतच व्हिडिओ व फोटो काढून अनेकदा पीडीतेला ब्लेकमेल करीत तिचे दुसर्‍यांदा जमलेले लग्नदेखील मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 19 वर्षीय पीडीतेने मेहुणबारे पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून संशयित प्रभाकर लक्ष्मण पवार (50, चाळीसगाव तालुका) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

वारंवार अत्याचार : व्हिडिओ व्हायरलची दिली धमकी
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावातील 19 वर्षीय पीडीता शेतात गेल्यानंतर आरोपीने तिला शेतातील घरात नेत बोलायचे आहे, असे सांगून ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.



त्यानंतर पीडीतेशी वारंवार मोबाईल संपर्क साधून भेटण्यासाठी आग्रह धरला शिवाय पीडीता चाळीसगावातील महाविद्यालयात आल्यानंतर तिथेदेखील संशयित आला व त्याने एका लॉजवर पीडीतेला नेत पुन्हा अत्याचार केला व अश्लील फोटो तसेच व्हिडिओ काढले. जानेवारी 2022 ते नोव्हेंबर 2023 दरम्यान हा प्रकार सुरू राहिला. यानंतर पीडीतेचे दुसरे लग्न जमले मात्र आरोपीने मध्यस्थीला फोन करीत पीडीतेसोबत अनैतिक संबंध असल्याचे सांगून अश्लील फोटो व व्हिडिओ असल्याचे सांगून लग्न मोडले. तपास सहाय्यक निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहिदास माळी करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !