मध्यप्रदेशातील कुविख्यात दरोडेखोर चोपडा पोलिसांच्या जाळ्यात


Madhya Pradesh’s notorious robber Chopra in police net चोपडा : चोपडा पोलिसांनी एका शेतातून मध्यप्रदेशातील सात दरोडेखोरांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दरोड्यातील हत्यारांसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरोडेखोरांकडून महिंद्रा कंपनीचे जनरेटरसह महिंद्रा पिकअप वाहन जप्त करण्यात आले.

ताब्यातील संशयितांमध्ये दोन अल्पवयीन
दादला नरगावे (20), सियाराम बेलोरसिंग चव्हाण (23), जगदीश दमडीया नरगावे (24), ईकेश रामलाल सोलंकी (19), अर्जुन बळीराम आर्य (19, सर्व रा.सेंधवा) या पाच जणांसह दोन अल्पवयीनांचा समावेश आहे. संशयितांकडून लोखंडी रॉड लोखंडी गज, मिरची पूड, लोखंडी पकड, दोन लोखंडी पाने, चाकू, धारदार लोखंडी करवत यासह पाच लाखांचे महिंद्रा कंपनीचे जनरेटर मशीन व तीन लाख रुपये किंमतीची महिंद्रा पिकअप जप्त करण्यात आली. ही कारवाई बुधवार, 22 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली.



गोपनीय माहितीरून कारवाई
चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथील अजित मोहन पाटील (49) यांच्या शेतात जीओ कंपनीचे टॉवर बसवलेले असून त्या टॉवरचे जनरेटर चोरी होत असल्ल्याची माहिती बुधवारी पहाटे तीन वाजता पोलिस हवालदार संतोष पारधी यांना पोलिस ठाण्यात फोनद्वारे मिळाली होती. त्या नुसार पोलिस तत्काळ रेलच्या मारोती मंदिराजवळ पोहचले.एक आरोपी हा पोलिसांना चोसाकाकडे पळून जाताना दिसला. पोलिसांनी त्याला या परिसरातील शेतात पाठलाग करून रंगेहाथ पकडले असता त्याने दिलेल्या माहितीवरून अन्य आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !