आजारपण खोटे निघाल्यास भर चौकात जोडे मारा ; आमदार एकनाथराव खडसेंचे मंत्री महाजनांना आव्हान !
If the illness turns out to be fake, add it to the square ; MLA Eknathrao Khadse’s challenge to Minister Mahajan! मुंबई : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्यातील सख्य संपूर्ण राज्याला ठावूक आहे. त्यातच अलीकडे आमदार खडसेंना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यावरून मंत्री महाजनांनी त्यांच्यावर टिकेचे बाण चालवले होते व 137 कोटींची नोटीस आल्याने हे नाटके चालवण्यात आल्याचा आरोपही केला होता. या टिकेला आमदार खडसे यांनी जोरदारपणे उत्तर दिले आहे. आमदार खडसे म्हणाले की, माझ्या आजारपणाचे सगळे कागदपत्रे तपासा, जर माझे आजारपण खोटे असेल तर मला भर चौकात जोड्याने मारा आणि खरे असेल तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो, असे आव्हानच आमदार खडसेंनी गिरीश महाजनांना दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. व्हिडिओ ट्विट करीत मंत्री गिरीश महाजनांना हे आव्हान आमदार खडसेंनी दिले आहे.
मंत्री महाजनांनी केली होती टिका
आमदार एकनाथराव खडसे यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने तातडीने हवाई रुग्णवाहिकेने जळगावहून मुंबईला हलवण्यात आले होते. तिथे उपचार घेतल्यानंतर ते जिल्ह्यात परतले मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी 137 कोटींची नोटीस त्यांनी कोर्टाची सहानुभूती मिळवण्यासाठी आजारपणाचे नाटक केल्याचा आरोप केला होता. आमदार खडसेंनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असा सल्लाही मंत्री महाजनांनी दिला होता.


आमदार खडसेंनी दिले आव्हान! …तर भर चौकात जोड्याने मारा
मंत्री महाजनांच्या टिकेला आमदार एकनाथराव खडसे यांनी जोरदार उत्तर व्हिडिओ ट्विटद्वारे दिले आहे. आमदार खडसे म्हणाले की, गिरीशभाऊ महाजन, नाटक करण्याची मला कधी गरज पडत नाही व तो माझा धंदाही नाही. त्यासंदर्भात आज मी तुम्हाला आवाहन करतो, माझ्या आजारपणाचे सगळे कागदपत्रे तपासा, जर माझे आजारपण खोटे असेल तर मला भर चौकात जोड्याने मारा आणि खरे असेल तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो.
खडसेंची उपरोधिक टिका ; महाजनांचे प्रसुतीशास्त्रात जास्त लक्ष
आमदार खडसे म्हणाले की, वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना गिरीश महाजन यांनी प्रसुतीशास्त्र विभागात जास्त लक्ष दिले त्यामुळे त्यांची त्या खात्यातून हकालपट्टी झाली, अशा शब्दांत एकनाथ खडसेंनी प्रतिहल्ला केला. त्यांची साठी बुद्धी नाठी झालेली आहे त्यामुळे त्यांना काही सुचत नाही. त्यांना खात्री करायची असेल तर माझी सर्व कागदपत्रे तपासावीत. त्यात कार्डियाक अॅरेस्ट हा काय प्रकार असतो तो पाहून घ्यावा. आजार खरा की खोटा हे तपासावे. महाजनांना खडसे नावाची कावीळ झाली आहे.





