एरंडोल तालुक्यातील सराईत गुन्हेगार स्थानबद्ध


Criminals stationed at Sarait in Erandol taluka एरंडोल : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या उपद्रवींवर जिल्हा पोलिस प्रशासनाकडून धडक कारवाई केली जात आहे. याच अनुषंगाने एरंडोल तालुक्यातील सराईत गुन्हेगार नाना उर्फ बुधा उत्तम कोळी (32, रा.रवंजे ता. एरंडोल) याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ अर्थात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली.

दहा गंभीर गुन्हे दाखल
नाना कोळी याच्याविरुद्ध एरंडोल, धरणगाव आणि जळगाव शहर पोलिसात गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे दाखल आहेत. याशिवाय एरंडोल पोलिसांनी त्याच्याविरुद्ध चार वेळेस प्रतिबंधाकात्मक कारवाई केली आहे. नाना कोळी याच्याविरुद्धचा ‘एमपीडीए’चा प्रस्ताव पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी तयार करीत एलसीबीकडे 17 ऑक्टोंबर रोजी सादर केला होता. या प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नाना कोळीला एक वर्षासाठी स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले.



येरवडा कारागृहात रवानगी
आदेश पारीत होताच नाना कोळीला एरंडोल पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, सहा.निरीक्षक गणेश आहिरे, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, पोलिस उपनिरीक्षक विकास देशमुख, हवालदार राजेश पाटील, अनिल पाटील, अकील मुजावर, मिनी कुमावत, प्रशांत पाटील, पंकज पाटील आदींनी शनिवार, 25 नोव्हेंबर रोजी पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले.

एमपीडीए प्रस्ताव जिल्हा पोलिस अक्षीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक सुनिल नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला होता. याबाबतचे कामकाज एलसीबीचे वरीष्ठ निरीक्षक किसन नजन-पाटील आणि त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, हवालदार सुनील पंडीत दामोदरे, हवालदार जयंत भानुदास चौधरी, कॉन्स्टेबल ईश्वर पंडीत पाटील आदींनी काम पाहिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !