जळगावात टेलरींग दुकानाला आग : दोन लाखांचे नुकसान


Fire at a tailoring shop in Jalgaon: Loss of two lakhs जळगाव : जळगाव शहरात टेलरींग दुकानाला आग लागल्याने सुमारे एक लाख 87 हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. जुना खेडी रोडवरील जितू टेलर यांच्या दुकानाला आग कशामुळे लागली? याचे कारण स्पष्ट झाले नाही.

जुने व नवे कपडे खाक
प्रल्हाद छगन बाविस्कर (49, जुना खेडी रोड, जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. टेलरींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे जुना खेडीरोडवर जितू टेलर नावचे दुकान आहे. शनिवार, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या टेलर दुकानाला अचानक आग लागली. या आगीत शिवलेले व न शिवलेले कपडे, मशिनरी साहित्य मिळून एक लाख 87 हजार रूपये किंमतीचे साहित्य खाक झाले.



यावेळी महानगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आली. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. दुकानदार प्रल्हाद बाविस्कर यांनी दिलेल्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !