तांबापुर्‍यातील दुचाकी चोरटा रामानंद पोलिसांच्या जाळ्यात


Two-wheeler thief Ramanand in Tambapura police net जळगाव  : दुचाकी चोरट्याला रामानंद पोलिसांनी अटक केली आहे. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन जवळून दुचाकी चोरीप्रकरणी संशयित राहुल गणेश महाजन (20, तांबापुरा) यास अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून आरोपी जाळ्यात
भाऊसाहेब दादाजी बागुल (आकाशवाणी चौक, जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. 23 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता ते आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जवळ दुचाकी (एम.एच.41 आर.2363) लावली असता अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.



दरम्यान, चोरून नेलेली दुचाकी ही लाडवंजारी मंगल कार्यालयावरून संशयित आरोपी राहुल महाजन हा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संजय सपकाळे, जितेंद्र राजपूत, विजय खैरे, पोलीस नाईक हेमंत कळसस्कर, विनोद सूर्यवंशी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल इरफान मलिक, विजय जाधव यांनी कारवाई करत संशयित आरोपी राहुल गणेश महाजन (20) यास दुचाकीसह अटक केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !