दुचाकी व मोबाईल चोरटला एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : दुचाकी व मोबाईल लांबवणार्या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी काशीनाथ चौकातून अटक केली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
ईश्वर सुभाष घुगे (44, चिंचोली) हे 14 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता ते धार्मिक कार्यक्रम आटोपून दुचाकी (एम.एच.19 सी.बी.4114) ने चिंचोली येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यांना चक्कर येत असल्याने त्यांनी एमआयडीसीतील लोकमत कार्यालयाजवळ दुचाकी पार्क केली मात्र अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी आणि मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना संशयित आरोपी सोमनाथ भावगत अहिरे (कुसुंबा) याने दुचाकी चोरीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले.


एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हवालदार गणेश शिरसोळे, अल्ताफ पठाण, पोलिस नाईक किशोर पाटील, योगेश बारी, नाना तायडे यांनी काशिनाथ चौकात सापळा रचून संशयित आरोपी सोमनाथ अहिरे याला अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेली दुचाकी आणि मोबाईल हस्तगत केला आहे.
