काच पुसताना चालकाचे नियंत्रण सुटले अन् 300 फूट घाटात कोसळले वाहन : मालेगावातील चौघा भाविकांचा करुण अंत


While wiping the glass, the driver lost control and the vehicle fell into a 300 feet gorge: Four devotees in Malegaon met a tragic end चाळीसगाव : अक्कलकोट येथून देवदर्शन करून परतणार्‍या भाविकांची तवेरा कन्नड घाटात कोसळून झालेल्या अपघातात पती-पत्नीसह चौघे ठार झाले तर अन्य सात भाविक किरकोळ जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास कन्नड घाटात घडला. मयत व जखमी मालेगावातील रहिवासी आहेत. वाहनाच्या काचेवरील आलेले दवबिंदू पुसताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने तवेरा 300 फूट घाटात कोसळल्याने हा अपघात घडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

चौघे जागीच ठार : चालकासह सात जण जखमी
या अपघातात प्रकाश गुलाबराव शिर्के (68) व शिलाबाई प्रकाश शिर्के (62) या दाम्पत्यासह वैशाली धमेंद्र सूर्यवंशी (42) व पूर्वा गणेश देशमुख (7, रा. मालेगाव) यांचा मृत्यू झाला. अनुज धर्मेद्र सूर्यवंशी (19), कृष्णा वासुदेव शिर्के (05), पुष्पा पुरुषोत्तम पवार (41), सिध्देश पुरुषोत्तम पवार (7), रुपाली गणेश देशमुख (35), जयेश धर्मेंद्र सूर्यवंशी (17), वाहन चालक अभय पोपटराव जैन (50) हे सात जण जखमी झाले.





नियंत्रण सुटल्याने कोसळले वाहन
मालेगाव येथील भाविक अक्कलकोट दर्शनासाठी गेल्यानंतर परतीच्या प्रवासात तवेरा (एम.एच.41 व्ही.4816) ने मालेगावकडे येत असताना कन्नड घाटात वाहनाच्या काचेवर साचलेले दव (पाण्याचे ठिबके) पुसण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले व वाहन थेट 300 फूट दरीत कोसळले.पोलिसांच्या सतर्कतेने जखमींना जीवदान
अपघातानंतर चाळीसगाव शहरचे निरीक्षक संदीप पाटील, महामार्गच्या सहाय्यक निरीक्षक रुपाली पाटील, पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी, ग्रामीणचे सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे, हवालदार संदीप पाटील, शंकर जंजाळे, नंदू परदेशी, युवराज नाईक, भूपेश वंजारी, विजय शिंदे, ज्ञानेश्वर बडगुजर, संदीप माने, मनोज पाटील, नरेंद्र बाविस्कर, जोशी व चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे हवालदार राहुल सोनवणे, नितीन वाल्हे, महेंद्र पाटील, भूषण पाटील, अमित बाविस्कर, समाधान पाटील, ज्ञानेश्वर गीते व महामार्गचे गणेश काळे, विरेंद्र शिसोदे, शांताराम थोरात, सुशिल पाटील, योगेश पवार, विकास खैरनार, जितेंद्र माळी, ललित महाजन, गणेश पवार आदींनी मदतकार्य करीत जखमींना उपचारार्थ हलवले. दरम्यान, अपघात स्थळापासुन काही अतंरावर रस्त्यावर दरड कोसळल्याने पुन्हा अपघात होवू शकतो याचे गांभीर्य लक्षात घेवुन वरील सर्व स्टाफने सदर रस्त्यावर कोसळलेली दरड ही रात्रीच उचलुन रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !