दुचाकीला कट मारल्याच्या वादातून बस चालकाला मारहाण


A bus driver was beaten up due to a dispute over hitting a two-wheeler धरणगाव : तरुणीच्या दुचाकीला बस चालकाने कट मारल्याच्या आरोपातून बस गावात आल्यानंतर दोघांनी बसचालकास बेदम मारहाण केली. ही घटना सोमवार, 27 रोजी सायंकाळी नांदेड येथे गावठाण चौकात घडली. या प्रकरणी धरणगाव परस्परविरोधी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.

कट लागल्याच्या वादातून चालकास मारहाण
जळगावहून नांदेडला सायंकाळी चार वाजता येणारी बस (एम.एच.14 बी.टी.3019) ही चार वाजेच्या सुमारास नांदेडला आल्यानंतर नारणे गावाकडे येत असताना एका 20 वर्षीय तरुणीच्या दुचाकीला बसने कट मारला. त्यामुळे दुचाकी घसरली व तरुणीच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. यामुळे बस गावात आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी बसचालक तुकाराम आनंदराव रायसिंग (46, बांभोरी) यांना बेदम मारहाण केली. बसचालक गंभीर अवस्थेतच साडेचार वाजेपासून सायंकाळच्या साडेसहा वाजेपर्यंत बसच्या सीटवर पडून होते.



परस्परविरोधी गुन्हे दाखल
दरम्यान, ही घटना नांदेड येथील रहिवासी व गोंदिया पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शरद सैंदाणे हे गावी सुटीवर आले असल्याने त्यांना समजली. यामुळे त्यांनी स्वतःच्या वाहनातून बसचालकास धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक करीम सैयद यांच्यासह पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, जखमी तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसात बस चालक तुकाराम रायसिंग यांच्याविरोधात तर बस चालकाच्या फिर्यादीवरून महेंद्र पाटील आणि तेजस पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक करीम सैयद करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !