जळगावात कारचे हॅण्डल तोडत घराच्या आवारात टाकल्या दारूच्या बाटल्या
In Jalgaon, after breaking the handle of the car, the liquor bottles were thrown in the premises of the house जळगाव : दारुच्या नशेत दारुच्या रीकाम्या बाटल्यांचे चार पोते घराच्या कुंपणात टाकत संशयिताने कारचे हॅण्डल तोडले. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राकेश राजु वानखेडे (कानळदा) या तरुणाविरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
कुंपणात टाकल्या रीकाम्या बाटल्या
महेंद्र रामेश्वर पांडे हे कानळदा रोड परीसरात राहतात. त्यांच्या घराच्या गच्चीवर आणि कंपाऊंडमध्ये संशयित राकेश वानखेडे याने दारुच्या नशेत फिरुन देशी दारुच्या रीकाम्या बाटल्यांच्या चार गोण्या टाकल्या व त्यानंतर पांडे यांच्या घरासमोर लावलेल्या त्यांच्या कारच्या दरवाज्याचे हँडल तोडून नुकसान देखील केले. तपास हवालदार भास्कर ठाकरे करीत आहेत.


